Tuesday, October 17, 2023

पक्षी सप्ताह

दिनांक 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कालावधीमध्ये आपण आपल्या भागातील विविध प्रकारचे पक्षांची माहिती करून घेतल्यास आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल, तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या कालावधीचा उपयोग करून पक्षांविषयी विविध प्रकारची माहिती त्यांना आपण देऊ शकतो.
जसे की पक्षांचे प्रकार, पक्ष्यांचे घरटे, पक्षांच्या चोचीचे प्रकार, पक्षांचा अंडे देण्याचा कालावधी, स्थलांतरित पक्ष्यांची माहिती अशा विविध प्रकारची माहिती आपल्याला विद्यार्थ्यांना नक्कीच देता येते.

Monday, October 16, 2023

🕷 सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन स्पायडर चा शोध

🕷🕸
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधे म्हणते संशोधकांना एका नवीन स्पायडरचा शोध लागला आहे.
ही कोळ्याची नवीन प्रजाती असून Sparumbabus sindhudurg असे या नवीन प्रजातीचे नाव आहे.
वन्यजीव संशोधक गौतम कदम यांनी हे संशोधन केले आहे.

Monday, October 9, 2023

अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक


अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक कोणाला दिला.
>क्लोडिया गोल्डीन यांना यावर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
>त्या अमेरिका देशाच्या असून हारवर्ड विद्यापीठात प्राध्यापिका आहेत.
> आतापर्यंतच्या तिसऱ्या महिला आहेत ज्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे