Wednesday, January 17, 2024

JNVST 2024 EXAM

 नवोदय विद्यालय परीक्षा 2024.

  • नवोदय विद्यालय परीक्षा यावर्षी दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. 
  • या परीक्षेचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
  • तरी आपल्या प्रवेश पत्रावरून परीक्षा केंद्र आणि तत्संबंधीची माहिती लवकरात लवकर जाणून घेण्यात यावी

Monday, January 8, 2024

10 वी 12 वी परीक्षेचे नवे वेळापत्रक, New timetable of SSC and HSC Exam

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावी SSC आणि बारावी HSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. इ. 12 वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून आणि 10 वीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.
मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४पर्यंत असेल. दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ पर्यंत होईल.

१२वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आहे.

 मंडळाच्या निवेदनानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इ दहावी दि. १ मार्च २०२४, शुक्रवार ते मंगळवारी, दि. २६ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे.

तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४.

वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा