माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावी SSC आणि बारावी HSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. इ. 12 वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून आणि 10 वीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.
मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४पर्यंत असेल. दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ पर्यंत होईल.
१२वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आहे.
मंडळाच्या निवेदनानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इ दहावी दि. १ मार्च २०२४, शुक्रवार ते मंगळवारी, दि. २६ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे.
तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४.
वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा
No comments:
Post a Comment